त्या महिलेच्या खुनातील मुख्य आरोपी पकडला; खुनाचा थरार ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल

स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला दोन्ही आरोपी पकडण्यात यश

कळंब : द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हिचे मारेकरी अखेर पोलिसांना सापडले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या आरोपींना पकडण्यात यश आले आहे. रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या 2 आरोपींना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. उस्मान सय्यद याला संशयित म्हणून 3 दिवसांपूर्वी पोलिसांनी केज येथून ताब्यात घेतले होते. तर मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ रामा भोसले ज्याने प्रत्यक्षात खून केला तो पोलिसांना गुंगारा देत होता. आळंदी, पुणे, मिरज, गोवा, कर्नाटक या ठिकाणी तो फरार फिरत होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपीनिय माहिती मिळाली की तो येरमाळा येथे आलेला आहे. सापळा रचून पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मनीषा बिडवे-कारभारी ही 45 वर्षांची महिला द्वारका नगरी वसाहतीत राहत होती. 27 तारखेला तिच्या राहत्या घरात तिचा सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मृत महिला ही संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेली महिला असून तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शंका उपस्थित केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण आले होते. मात्र पोलिसांनी या महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी सबंध नसल्याचं सांगून टाकलं. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी मिळालेले पुरावे, फोन कॉल्स याच्या माध्यमाने पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला अखेर पोलिसांना दोन्ही आरोपी अटक करण्यात यश आले आहे.

खुनाचा थरार

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मनीषा बिडवे हिच्याकडे मागील काही महिन्यांपासून रामेश्वर भोसले नावाचा तरुण काम करत होता. तो सुरुवातीला तिचा ड्राइव्हर होता. नंतर संबंधित महिलेसोबत त्याचे सबंध जुळले. नंतर-नंतर ती त्याला त्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून टॉर्चर करू लागली. गुन्हा दाखल करायची धमकी देऊन त्याचा छळ करायला लागली. दररोज आरोपी रामेश्वरला मारहाण करून शारीरिक छळ करत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून कळतेय.

घटनेच्या दिवशी म्हणजे 22 मार्च रोजी तिने त्याला 100 उठाबशा काढायला लावल्या होत्या. या सगळ्या त्रासातून त्याने तिच्या डोक्यात वार केला. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला, असं देखील पोलीस सूत्रांकडून कळतंय. इतकंच नाही तर संबंधित आरोपी 2 दिवस मृतदेह असलेल्या घरात राहिला, जेवण ही तिथेच करायचा. तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने ती तिथून तिची गाडी घेऊन बाहेर पडला. यादरम्यान त्याने त्याचा केजचा असलेला मित्र उस्मान सय्यद याला द्वारका नगरीत आणून मृत बॉडी दाखवली. दोघेही सुरुवातीला पुरावे नष्ट करायला आल्याचं, सूत्रांकडून कळतंय.

आरोपी अटक

अखेर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सुरुवातीला LCB च्या पोलिसांनी उस्मानला ताब्यात घेतलं, त्यानंतर तपासाचा धागा पकडत मुख्य आरोपी रामेश्वर भोसले याला देखील आज अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे , फरहानखान पठाण, जावेद काझी या पोलीस पथकाने आरोपींना पकडण्यात यश मिळवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button